♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
नुसतेच बघायचे, न बोलता
हे तुझे नेहेमीचे
ओठ मुके, नजर खाली
मला कसे कळायचे?
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
वाट पहाणे तुजी
हाच राहिला एक ध्यास
दुसरा विचार नाही मी करत
तूच जीवन तूच आहेस श्वास
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
मिटलेल्या डोळ्यांमध्ये
तुझेच प्रतिबिंब
बेमोसमी पावसात नुस्ता
भिजलोय चिंब चिंब
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणा पर्यंत
मी फक्त तुझीच आहे
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
विरहातही प्रेम असत
प्रेमात सगळ माफ असत
सजा देणारे तुम्ही आम्ही कोण
प्रेमच प्रेमाची परीक्षा पाहत असत
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
मऊपण काय असत
हे तिच्या एका स्पर्शाने सांगितलं
त्या एका स्पर्शातच मी
तीच प्रेम मागितलं
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
प्रीतीचे ते उमलते फुल
आठवणीत आहे दरवळत
तुझ्या प्रेमासाठी भांड- भांड भांडलो
तरी तुला कसे नाही कळत
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
रुसून बसने तिचे
मला खूप आवडते
काही न बोलता ओंजळीत टाकली फुले
की मिठीतच स्थिरावते
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
झोका घेताना
येणारी तुझी आठवण
म्हणजे तुझ्या सोबत घालवलेल्या
गोड क्षणांची साठवण
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
डोळ्यांच काय
ते नेहमी पाणावतात
माझ तुझ्यावरच प्रेम
अप्रत्यक्षपणे खुणावतात
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
तू आणि पाऊस,
असेच अवेळी येता,
नको नको म्हणता,
चिंब चिंब करून जाता........
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
माझ्या प्रत्येक श्वासात
तुझ्या आठवणींचा गंध आहे
दूर बघ तो पारवा
कसा आपल्यातच धुंद आहे
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
आठवणीच्या हिंदोळ्यावर
तुझे माझे भेटणे
एकांती पावूल वाटेवर
तुझ्या आठवणीतच माझे चालणे
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
अंतर ठेवून ही
बरोबरी राखता येते
दूर राहून ही प्रेमाची
गोडी चाखता येते.
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
मन भिजून जात ना,
ऐनवेळी पावसान गाठल्यावर..
अगदी तसाच वाटते मग,
तुझ्या कुशीत मिटल्यावर..
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
गुलाबा सारखे
रूप तुझे देखणे
ओठातल्या शब्दांनी
धुंद मला करणे
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
गालावरची खळी पड़ते
डोळ्यात तुजे स्वप्न रंगवतो
का बर असा मी
स्वताला तुझ्यात गुंतवतो
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
डोळ्यातल्या स्वप्नाला
कधी प्रत्यक्षातही आन
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
Post a Comment Blogger Facebook