निळ्याभोर आकाशात अवचित घन अंधार दाटला,
गरजत बरसत मेघ नभी अवतरला.
वीज अशी चमकलि,
धरती ला भेटायाची ओढ तिला लागली.
घन असा ओथम्बुन वार्या सवे चालला,
पाहून जल्लोष सारा हर्ष मनी जहाला.
चिंब पाण्यात भिजण्याचा, आनंद काही वेगळा,
प्रीतीच्या पाखरांना हा काळ भासे आगळा.
मेघ म्हणे कोणी, कोणी म्हणे घन,
फिरत राहतो इथे तिथे राई राई, वन वन.
ऋतूच्या आगमनाचा हा मनमोहक नजराणा,
थेंबा थेंबातला उत्कट तराणा,
धरती होई मन्त्रमुग्ध, पांघरोनि रंग हिरवा
सुखद गारवा देतो हा मधु शिरवा,
येत राहो असाच सुखद पाउस, मनीचा आजीवन,
माणसा रे ........ पाणी आहे संजीवन...
Submitted by: स्मिता पेठे
Post a Comment Blogger Facebook