तुला मी विसरु तरी कसे ?
तुला मी विसरु तरी कसे ?तुझ्या आठवनींना मिटवु तरी कसे ?
माझ्या ह्रुदयात जे तुझ घर आहे
ते घर मी माझ्याच हाताने पेटवु तरी कसे ?
आजकालचं दुख:ही मला अनमोल आहे
शेवटी ते तु दिलेलं आहे
मग मी या निर्रथक अश्रुमागे
त्याला लपऊ तरी कसे ?
मनाचे ढगही दाटुन आलेत
हे डोळेही अश्रुंचा
मुका पाऊस बरसवु लागलेत
या वेड्या मनाची तगमग
या मनाचे निर्मळ स्वप्न
मी तुला सांगु तरी कसे ?
बघ आता विजा चमकु लागल्यात
सोबत पावसाचाही जोर आहे
सांग काय करु आता ?
या वादळात बोलकी वळचण
मी शोधु तरी कुठे ?
ओठावर आलेले हे शब्द
मागे फ़िरुऊ तरी कसे ?
भर पावसातही कोरड्या या मनाला
तुझ्या विरहाने भिजवु तरी कसे ?
आता या पुढे
तुझी सोबत नसल्यावर
मग हे शब्दांचे रंग
मी उधळु तरी कसे ?
सांग तुला मी विसरु तरी कसे
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook