सॉलिड फिल्माड रजनीकांतचा एक नवीन प्रोजेक्ट... 'लगान'चा रिमेक. सबकुछ रजनीकांत ईस्टायलमुळे अख्खा सिनेमा अर्थातच सॉलिड टॉलीहीट. नाच गाणी, फायटिंग... या सगळ्यात वर कहर म्हणजे सिनेमाचा क्लायमॅक्स. हा सिनेमा 'लगान'चा रिमेक असल्यामुळे शेवटी क्रिकेटच्या मॅचने होणं अपरिहार्यच. तर शेवटचा सीन सुरू होतो.
सीन : रजनीकांतच्या टीमला जिंकायला दहा रन्सची गरज, उरलाय एक बॉल आणि बॅटिंग करतोय अर्थातच आपला रजनीकांत. (व्हेल्वेटची टाईट लाल पँट आणि फुलाफुलांचा शर्ट,
गळ्यात स्कार्फ आणि डोळ्याला गॉगल) समोरच्या सुपरहीट ब्रिटीश बॉलरने दोन चार उड्या मारल्या. तोंड चार पाचदा तोंड विचकलं, आठ दहा वेळा बॉल मांडीला घासला... दहा बारा वेळा उगाच लूक्स दिले आणि रजनिकांतच्या बॅटीवर जॅम जोशात बॉलिंगसाठी स्टार्ट घेतली. आता काय होणार...? अशा परिस्थितीत जिंकणार तरी कसं? थिएटरमधे सगळ्यांचे श्वास वरच्या वर अडकलेले. पण रजनीकांत एकदम कुल. बॉल येताना बघून तो गॉगल काढतो. वर उडवतो आणि तो गॉगल पुन्हा डोळ्यांवर येऊन बसतो. मग बॅट पुढे सरसावून बॉलला असा टोलावतो. की बॉलची दोन शकलं होतात. एकाची जाते सीक्सर आणि दुसर्‍याची जाते फोररन... आणि अशातर्‍हेने रजनीची टीम मॅच जिंकते.


......................................................................................................

सूर्य आहे साक्षीला त्या दिवशी संध्याकाळी सांबू चोंबाळे सौ. गुंडी सांबू चोंबाळेला घेऊन समुदावर फिरायला गेला. आणि मावळत्या सूर्याकडे पहात तिचा हात हातात घेतला.

सांबू : प्रिये, प्रियत्तमे... या मावळत्या सूर्याला साक्ष ठेऊन एक सांगशील?
गुंडी : विचारा ना, प्राणनाथा.
सांबू : बघ हा खर्र, खर्र सांगायचं..
गुंडी : तुम्ही प्राणही मागितले, तरी वो दर्द मे हसते हसते पी लूंगी.
सांबू : समजा, म्हणजे समजा मी जरा अचानक मेलो. तर तू पुन्हा लग्न करशील का?
गुंडी : छे, छे, छे... असं अभद्र बोलू तरी कसं शकता. प्राणप्रिय पतीराजा.
सांबू : ऐकून बरं वाटलं बघ. पण कधी कधी मला खूप टेन्शन येतं गं. समजा अशी वेळ आलीच. तर काय करशील तू माझ्या नंतर...?
गुंडी : काळजी करू नका हो. अशी वेळ आलीच. तर माझी धाकटी बहीण आहे ना सुंदरा. तिच्यासोबत राहीन आयुष्यभर. पण गडे, तुम्ही काय कराल हो, माझं जर असं झालं तर?
सांबू : मीही तुला वचन देतो प्रिये, जर दुर्दैवाने तुझं असं काही झालं तर मीही असंच करेन

......................................................................................................

सौ. बबडी बबन बोबडे : अहो, बाइक एवढी जोराने नका ना चालवू. मला बाई भीती वाटते.
श्री. बबन बोबडे : अरेच्या, तुला पण भीती वाटते काय. अगं मग माझ्याप्रमाणे तूही डोळे घट्ट बंद करून घे की.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top