अगदी लग्न ठरल्या दिवसापासून
हे असाच चाललय..

आईला इतक आनंदी या आधी,
मी कधीच नाही पाहिलय..
बाबांचा तर थाटच नका विचारू,
मला कुठे ठेवू आणि कुठे नको असा झालय त्याना..
भगिनी मंदलाचा भलताच बेत शिजतोय,
कोणत्या पार्लरमधे जायच इथेच वाद रंगतोय...
भाउराया अगदीच खुशीत आहेत,
बहिणीच्या लग्नात यांचीच मिजास जास्तय..

रोज चिडवून ह्या सगल्यानी, मला हैराण करून सोडलय..
हयात भर घालायला मैत्रिणी आहेत..
आता अजुन इथे 'हे' बहाणे काढून आलेत..
आणि त्याना चिडवायला आणखी मार्ग झालेत..

हसू नका असे...
सगले असे बघतात लाज वाटते मला...
आजपर्यंत वाटल नव्हत..अस काही होतय..
राग आला असतानाच..उगाच हसू फुटतय..
सहज जरी 'त्यांच' नाव कोणी घेतल तरी..
गाल लाल होतायेत...
अरे हसू नका असे...
मी अगदी खर सांगतेय..
लग्न ठरल्या दिवसापासून हे असच चाललय..
हे असच चाललय..

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top