खळाळत्या जीवनाचा निर्झर म्हणजे डोंबिवली
मनातल्या माणुसकीचा पाझर म्हणजे डोंबिवली

रेतीबंदरचा वारा म्हणजे डोंबिवली
अन् थंडीत घामाच्या धारा म्हणजे डोंबिवली
फडके रोड वरची तरुणाईची मस्ती म्हणजे डोंबिवली
अन् Modern Cafe च्या जेवणानंतरची सुस्ती म्हणजे डोंबिवली
प्रेमजीभाई मेंशन, ५२ चाळ म्हणजे डोंबिवली
अन् Mall च्या नावाखाली Marriage Hall म्हणजे डोंबिवली
फुटपाथवरची लल्लन दुबेची बाज म्हणजे डोंबिवली
अन् रामनगर, टिळकनगर चा पुणेरी माज म्हणजे डोंबिवली
मुंबईच्या आलिशान गालिच्यापुढे टाकलेलं सरकारी घोंगड म्हणजे डोंबिवली
अन् "लात मारीन तीत पानी कारीन" म्हन्नारया बाला लोगांचं गांव म्हणजे डोंबिवली
सकाळ संध्याकाळ रेल्वेतली चौथी सीट म्हणजे डोंबिवली
अन् ८ तास Load Shading मधली धीट डोंबिवली
ठाकुरचा वडा-पाव अन् मुनमुनची मिसळ खाणारी………… . झणझणीत डोंबिवली
अन् १० वी १२ वी मध्ये यश मिळवणारी………… ……… …. दणदणीत डोंबिवली
कृष्णोकृष्णी , जिथे-तिथे कधी चिडलेली तर कधी चिडवलेली डोंबिवली
कधीमेंगाळलेली, कधी नटलेली, कधी नडलेली, कधी नाडलेली
तरी आनंदाने आणि गर्दीने फुललेली ठाणे जिल्ह्याची शान म्हणजे डोंबिवली
पानी आणि वीजेने त्रासणारी डोंबिवली
तरीही गुढीपाडव्याला लेझीमवर नाचणारी सांस्कृतिक डोंबिवली
" तुमच्याकडे म्हणजे डास-खड्डे फार" अशी दूषणं सहन करणारी सोशिक
आणि
तरीही लोकल ट्रेनच्या भजनांमधे रमणारी "स्वरभूषण" डोंबिवली…………

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top