एक सरदार आपल्या घरासमोर आपल्या कंपाऊंडमध्ये झाडांना पाणी देत होता. तेवढ्यात तिथे बाईकवर एक पोलीस आला. सरदारजीच्या घरासमोर गाडीवरुन उतरला. सरदारजीच्या घरापासून ४०-५० फुट पळतच समोर गेला आणि थोड्या वेळाने सरदारजीच्या घरासमोर परत आला. नंतर तो दुसऱ्या बाजुला ३०-४० फुट पळत गेला आणी थोड्या वेळाने पुन्हा परत आला. झाडांना पाणी देणारा सरदारजी हे सगळं पाहतच होता. सरदारजीच्या लक्षात आलेकी कदाचित पोलीस कुण्या गुन्हेगाराला शोधत असावा.

”काय साहेब … कुणाला शोधताय?” सरदारजीने विचारले.

पोलिस सरदारजीजवळ गेला. त्याने खिशातून एक फोटो काढला आणि सरदारजीला दाखवित म्हणाला,

” हा एका अट्टल गुन्हेगाराचा फोटो आहे… मी त्यालाच शोधत आहे… तुम्ही याला एवढ्यात इथून जातांना बघितले तर नाही? ” पोलिसाने विचारले.

सरदारजीने फोटो हातात घेतला आणि निरखुन त्या फोटोकडे पाहाले. फोटो पोलिसाला परत करीत सरदारजी म्हणाला, ” नाही … मी नाही बघितलं ”

पोलिस फोटो परत घेवून तिथून जावू लागला. थोड्या अंतरावर गेल्यावर सरदारजीने आवाज दिला, ” साहेब एक मिनिट”

पोलिस वळून पुन्हा सरदारजीजवळ आला.

” जरा तो फोटो तर दाखवा ”

पोलिसाने पुन्हा तो फोटो सरदारजीकडे दिला.

सरदारजीने थोडा वेळ त्या फोटोकडे पुन्हा निरखून बघितले आणि म्हटले,

” मला एक गोष्ट कळत नाही …जर हा एवढा अट्टल गुन्हेगार होता तर त्याचा फोटो काढला तेव्हाच त्याला का पकडलं नाही ?’

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top