कितीही ठरवलं तरी,
तुझ्यावर रूसून राहता येत नाही.
उघड्या डोळ्यांनी तुला टाळलं तरी,
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्यायच उरत नाही...
सगळं तुला देऊन पुन्हा,
माझी ओंजळ भरलेली.
पाहिलं तर तू तुझी ओंजळ,
माझ्याच ओंजळीत धरलेली...
डोळ्यातून अश्रू ओघळला,
की तोही आपला राहत नाही.
वाईट याचंच वाटतं की,
दुःख त्याच्या सोबत वाहत नाही...
आपण ज्याला आवडतो,
त्याच आपण होऊऩ जाव.
नाहितर आपल्या आवड़ीसाठी,
आपण उगाचच आयुष्य दवडतो...
काट्यात अडकलेला पदर,
अलगद सोडवून घेता येतो.
तुझ्यात गुंतलेलं मन मात्र,
सोडवता सोडवता गुंता होतो...
मलाच माहीत नसलेलं एक दुःख,
माझ्या मनात साठून आहे.
बरेचदा मी विचार करतो,
नक्की याचा ओघ कुठून आहे...
एक वेड फुलपाखरु,
एका फुलावरुन दुसऱ्या फुलावर उडायच.
थोडासा गोडवा सोधण्याच्या नादात,
वेड जगभर फिरायच कितीही ठरवलं तरी,
तुझ्यावर रूसून राहता येत नाही.
उघड्या डोळ्यांनी तुला टाळलं तरी,
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्यायच उरत नाही...
सगळं तुला देऊन पुन्हा,
माझी ओंजळ भरलेली.
पाहिलं तर तू तुझी ओंजळ,
माझ्याच ओंजळीत धरलेली...
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook