तू आलास दारी र,
बघ गळाया लागली
माझी झोपडी सारी र
तू नव्हता तवा बी
नभ डोळ्यात दाटलं,
का नव्हतं तुझं र
तवा काळीज फाटलं
तू अडला नडला
आता आलिया बारी र
बघ गळाया लागली
माझी झोपडी सारी र
तू धावला धावला
लोक हसली सारी र,
देव पावला पावला
केली पेरण सारी र
आता रुसू तू नगस
जीव झालाया भारी र
बघ गळाया लागली
माझी झोपडी सारी र
शेत पिकल जोमान
खाया मिळल भाकर,
धनी राबल शेतात
त्येला मिळल चाकर
गुळ ठेचुनीया कांदा
त्येला देईन न्याहारी र
बघ गळाया लागली
माझी झोपडी सारी र
आता जावू तू नगस
सोडुनिया ही माती र
नग विसरूस ओली
भिजली नाती र
माझ्या झोपडीला दिली
तू र ईभ्रत सारी र
बघ गळाया लागली
माझी झोपडी सारी र
सईमय.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook