कट्टयाला नसत॑ कधी
वयाच॑ ब॑धन,
कट्टयाला नसतंचं मुळी
व्यवहाराचं कोंदण.

सुखात तुमच्यासोबत
असतोच ना कट्टा,
दु:खात तुमच्यासोबत
रडतोच ना कट्टा.

हाय हॅलो करायला
इतरही सोबत असतात,
कट्टयासारखे जिवलग मात्र
थोडीच कुठे भेटतात.

हे व्यासपीठ नाही जिथं
भाषणं झोडली जातात,
हा कट्टा आहे यार…
इथं माणसं जोडली जातात…

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top