प्रश्न क्रमांक १) सकाळी तुम्ही तुमच्या मित्राना/ मैत्रिनिना काय
म्हणता?
अ) शुभप्रभात ब ) Good Morning क) काहीच नाही
प्रश्न क्रमांक २) बस किंवा लोकल मध्ये प्रवास करीत असताना इतर प्रवाशी
व्यक्ति बरोबर बोलताना सुरवात कोणत्या भाषेत सुरवात करता?
अ) मराठीत ब) हिंदीत क) इतर भाषेत

प्रश्न क्रमांक ३) कंपनीत किंवा इतर ठिकाणी मराठी सहकारीशी कोणत्या भाषेत
व्यवहार करता?
अ) मराठीत ब) हिंदीत क) इतर भाषेत

प्रश्न क्रमांक ४ ) बँकेत किंवा एखाद्या दुकानात खरेदी करते वेळी कोणत्या
भाषेचा वापर करता?
अ) मराठीत ब) हिंदीत क) इतर भाषेत

प्रश्न क्रमांक ५) कोणाशी फोनवर बोलताना सुरवात कशाने करता?
अ) नमस्कार ब) hello क) इतर

प्रश्न क्रमांक ६ ) नेहमी कोणत्या भाषेतील वर्तमानपत्र वाचता?
अ) मराठी ब) हिंदी क) इंग्लिश

प्रश्न क्रमांक ७) मराठी वृत्तपत्र खरेदी करता का?
अ) हो ब) नाही

प्रश्न क्रमांक ८) परप्रांतीय सहकारी मित्रांशी कोणत्या भाषेत बोलता?
अ) मराठी ब) हिंदी क) इंग्लिश

प्रश्न क्रमांक ९) किती परप्रन्तियाना मराठी शिकवली आहे ?
अ) एकाला ब) कोणालाच नाही क) प्रयन्त केला आहे

प्रश्न क्रमांक १०) महिन्यातून एक तरी मराठी चित्रपट बघायला चित्रपट
गृहात जाता का?
अ) हो ब) नाही क) कधी कधी

प्रश्न क्रमांक ११) आपली मुले किंवा आपले भाऊ बहिन कोणत्या माध्यमात
शिकतात?
अ) मराठी ब) इंग्लिश क) इतर

प्रश्न क्रमांक १२) आपण स्वत कोणत्या माध्यमातून शालेय शिक्षण घेतले आहे?
अ) मराठी ब) इंग्लिश क) इतर

प्रश्न क्रमांक १३) मतदानाला जाता का?
अ) हो ब) नाही

प्रश्न क्रमांक १४) मतदान मराठीची बाजु घेणार्या उमेदवाराला करता का?
अ) हो ब) नाही क) त्याचे काम बघून करतो, मराठी मुद्दा बघून नाही

प्रश्न क्रमांक १५) मराठीत बोलने ही संकल्पना संकुचित वृति वाटते का?
अ) हो ब) नाही

प्रश्न क्रमांक १६) शिवाजी महाराज म्हणाले की मनात पहिला विचार कोणता
येतो?
अ) शिवाजी महाराज की जय ब) एक पुराणपुरुष क) एक गुंड

प्रश्न क्रमांक १७) महाराष्ट्रातील गड – किल्ले यांना भेटी दिल्या आहेत
का?
अ) हो ब) नाही

प्रश्न क्रमांक १८) मराठी वेबसाइट बघता का?
अ) हो ब) नाही क) वेबसाइट माहिती नाही

प्रश्न क्रमांक १९) सही कोणत्या भाषेत करता?
अ) मराठीत ब) इंग्लिशमधे क) थोडी मराठीत थोडी इंग्लिश मधे

प्रश्न क्रमांक २०) मराठीत लिखाण करता का?
अ) हो ब) नाही क) कधी कधी

उत्तरे आणि त्यांचे गुण
प्रश्न क्रमांक १) अ – ५, ब- २, क- ० प्रश्न क्रमांक २) अ – ५, ब- ०, क-
० प्रश्न क्रमांक ३) अ – ५, ब- ०, क- ० प्रश्न क्रमांक ४ ) अ – ५, ब- ०,
क- ० प्रश्न ५ ) अ – ५, ब- २, क- ०
प्रश्न क्रमांक ६ ) अ – ५, ब- ०, क- ० प्रश्न क्रमांक ७ ) अ – ५, ब- ०
प्रश्न क्रमांक ८ ) अ – ५, ब- २, क- ० प्रश्न क्रमांक ९ ) अ – ५, ब- ०,
क- २ प्रश्न १० ) अ – ५, ब- ०, क- २
प्रश्न क्रमांक ११ ) अ – ५, ब- ०, क- ० प्रश्न क्रमांक १२ ) अ – ५, ब- ०,
क- ० प्रश्न क्रमांक १३ ) अ – ५, ब- ० प्रश्न क्रमांक १४ ) अ – ५, ब- ०,
क- ३ प्रश्न १५ ) अ – ५, ब- ०
प्रश्न क्रमांक १६ ) अ – ५, ब- २, क- ० प्रश्न क्रमांक १७ ) अ – ५, ब- ०
प्रश्न क्रमांक १८ ) अ – ५, ब- ०, क- ० प्रश्न क्रमांक १९ ) अ – ५, ब- ०,
क- २ प्रश्न २० ) अ – ५, ब- ०, क- २.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top