अन तिने हो म्हटल असतं तर बर झालं असतं
तिच्या वाचून तसं माझं काहिच अडत नाही
पण कधीकधी वाटतं
एखाद स्वप्न जर खर झाल असतं
अन तिने हो म्हटल असतं तर बर झालं असतं

तिच्यासाठी मी कालही झुरत होतो
तिच्यासाठी मी आजही झुरत आहे
अश्रूंबरोबर ती वाहत जाते अन
स्वप्नांमध्ये मी एकटाच झुरतो आहे
कधीकधी वाटतं की ते सारे अश्रू साठवायला हवे होते
स्वप्नांना बुडवायला तळ तरी झालं असतं
कधीकधी वाटतं की
तिने हो म्हटलं असतं तर बर झालं असतं

तिने दिलेलं मोरपिस मी अजूनही जपलं आहे
माझ्या नेहमीच्या पोकळ हास्यामागे
आज केवळ माझं दुःखच लपलं आहे
कधीकधी वाटतं ते मोरपिस
त्या पुस्तकातमध्येच राहू द्यायला हवं होतं
कदाचित पुस्तकालाच प्रेम करता तर आलं असतं
कधीकधी वाटतं की
तिने हो म्हटलं असतं तर बर झालं असतं

तिचं अन माझ अस कोणतं नात आहे
कि अव्यक्त भावनांना शब्दही मिळत नाहीत
शब्दही नकळत अनोळखी होऊन जातो
अन शब्दाला शब्दही कळत नाहि
कधीकधी वाटतं आपण तिला
स्वप्नांमध्येच पहायला हव होतं
कधीकधी वाटत की आपण
स्वप्नांमध्येच जगायला हव होतं
पण स्वप्न कधी खरी होत नसतात
तरीही कधीकधी वाटतं की
एखादं स्वप्न जर खरं झालं असतं
अन तिने हो म्हटल असतं तर बर झालं असतं

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top