' सर , अमक्या बँकेतून बोलतोय... लोन हवंय का ?' असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमाकेर्टर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा... हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी.

१. फोनवरून त्याने/तिने बोलणं संपवताक्षणी म्हणायचं , '' तुझा आवाज मला खूप आवडला. मी प्रेमातच पडलो/लेय तुझ्या. लग्न करशील माझ्याशी ?''

२. टेलिमाकेर्टिंगवाल्याला सांगा , '' मी आत्ता जरा

बिझी आहे. तुमचा घरचा नंबर द्याल का प्लीज! मी मोकळा झाल्यावर करतो तुम्हाला फोन. '' 

३. एकदा माहिती दिली की पुन्हा विचारा , '' हं , काय सांगत होतात तुम्ही ?'' असं तीन चार वेळा करा. 

४. तुम्ही जेवत असताना असा फोन आला की सांगा , '' मी जेवतोय. दोन मिनिटं जरा होल्ड करा हां. '' मग स्पीकर फोन ऑन करून फोन बाजूला ठेवा आणि आरामात जेवत राहा. खाण्याचे मचमच आवाज करा आणि इतरांशी गप्पाही मारत राहा.








टेलिमाकेर्टिंग कॉल कसे एन्जॉय कराल...

१. फोनवरच्या माणसाला सांगा, ''माझे सर्व व्यवहार माझा मुलगा पाहतो, त्याच्याशी बोला.' आणि फोन आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या हातात द्या (किंवा स्वत:च पाच वर्षांच्या मुलाच्या आवाजात बोलू लागा.)



२. ''हॅलो, हां कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? जरा मोठ्यानं बोला... आणखी मोठ्यानं बोला हो जरा... अजिबात ऐकायला येत नाहीये तुमचं... फोन आहे का चुन्याची डबी? हॅलो... आणखी मोठ्याने बोला...'' ही वैश्विक युक्ती टेलिमाकेर्टिंगवाल्यांवरही लागू पडतेच.

३. त्यांना

सांगा, ''एक मिनिट. एकेक शब्द बोला.
मी तुमचं सगळं बोलणं लिहून घेतोय. माझ्या काहीही लक्षात राहात नाही. एकेक शब्द आणि अगदी हळूहळू... घाई नको... हां कुठून फोन केलाय तुम्ही... आय... सी... आय... हळू हळू सांगा...''


४. त्यांनी विचारलं, ''हाऊ आर यू सर?'' की लगेच सुरुवात करा, ''मला हे तुमचं फार आवडलं. तुम्ही फक्त व्यापार करत नाही. माणुसकी जपता. आजकाल कोण कुणाला विचारतं हो की कसे आहात? माझे तर तुम्हाला सांगतो इतके प्रॉब्लेम सुरू आहेत...'' 
 

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top