फक्त , ' तू अन मी ' जाणे..

गार वारे असे वाहले,
भाव का गारठले ?
कुणी न जाणे..

पण , शहारे का गारवा देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

बहर वॄक्षांना मग फुलले,
पर्ण का गळाले ?
कुणी न जाणे..

पण , मनास का पालवी देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

वैशाख वणवे तेव्हा पेटले,
ह्रदय का होरपळले ?
कुणी न जाणे..

पण , वणवे का ऊब देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

नभी मेघ दाटून आले,
नयनांत का उतरले ?
कुणी न जाणे..

पण , पूर का तहान देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

परत ,
वाहले वारे सुखाचे,
फुलले बहर प्रेमाचे,
पेटले वणवे विरहाचे,
दाटले मेघ दु:खाचे..

ॠतु जीवनी असे आले,
श्वासांत का मिसळले ?
कुणी न जाणे..

पण , ऋतु प्रेम शिकवून गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

' तू अन मी ' जाणे..

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top