तू समजुन का घेत नाही..........
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !
इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !
तू दुर असलीस की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !
कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!
न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!
तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!
किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही !!
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.