मी कमी बोलतो म्हणुन
शब्द कागदावर उतरतात,
बोलायला गेलो तर वेडे,
ओठातुनाच परततात...
तुला डोळे भरून पहायच असत पण,
तू आलीस की डोळेच भरून येतात,
आणि बोलायच म्हटल तर शब्द,
मुकेपन धरून येतात...
गप्पच रहावस वाटत,
तुझ्याजवल बसल्यावर,
वाटत तू सगल ओलखावास,
मी नुसत हसल्यावर...
वाटत तुला चोरून भेटताना,
कोणी मला बघाव,
आणि त्याच्यादेखत ऐटीत मी,
तुझ्यासवे निघाव...
श्रवानाताल्या सरिसारख,
तुझ येन जाण,
आणि पागोलीच्या पाण्यासारख,
तुझ उरून राहण...
तू अस काही पहिलस की वाटल,
खरच पाउस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाइचा स्पर्श घडायला हवा...
तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे थेंब,
गालावरच रहायला तरसतात,
क्षणभर का होइना ते,
गुरुत्वाकर्शनाच विसरतात...
चिंब भिजल्यावर तहान लागते ना,
तस होत तुला भेटल्यावर,
तुलाच पाहत रहावस वाटत,
तुझ्या कुशीत मिटल्यावर...
तू भेटलीस आणि मी,
नगर वसवायाची भाषा करायला लागलो,
नगराची वेस म्हणुन,
क्षितिजरेशाच धरायला लागलो...
रस्ता वलन घेत गेला,
पावल त्यावर पडत गेली,
आपल्या दोघातील प्रत्येक घटना,
अशी न ठरवता घडत गेली...
आता आरशात पहाताना वाटत,
मी मला दिसणार नाही,
इतका तुझा झाल्यावर,
मी माझ्यापाशी असणार नाही...
सुकलेली पान पडतात ना,
वारा सुटल्यावर,
तशी तुझी स्वप्न पडत राहतात,
मी डोळे मिटल्यावर...
तरसन्याचा अनुभव,
आभाल बरसताना मी घेतला,
तू न्हावतिस तर प्रत्येक थेंब,
माझ्या अंगोपंगी रुतला...
तुझ्या आठवानिनी मुलायम होण,
हे नेहमिचच झालय,
मला वाटत हे नव वार,
तुझ्याकडूनच आलय...
नसती उत्तर द्यावी लागतात,
वेड्यासारख वागल्यावर,
पण वेड्यासारखच वागायला होत,
तुझी आठवण आल्यावर...
काही नाती तुटत नाही,
ते आपल्या नकळत मिटून जातात,
जाशी बोटांवर रंग ठेवून,
फुलपाखर हातून सुटून जातात...
प्रेमाला नात्यात बसवन,
खुपदा प्रेमाला घातक ठरत,
पण ते तस बसवल नाही तर,
लोकांच्या दृष्टीने पातक ठरत...
आपण त्याची सोबत धरावी,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपण आपल्या आवडीसाथी,
उगीच आयुष दवाड्तो...
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.