अफलातून पाट्या
१. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर...

' वाहन काळजीपूर्वक चालवा... आम्ही वाट पाहू.'

*****

२. 'नो स्मोकिंग' झोनमध्ये...

' तुमच्या तोंडातून धूर येताना दिसला, तर तुम्हाला आग लागली आहे, असं गृहीत धरून आम्ही पुढची कारवाई करू.

******

३. बंगल्याच्या दारावरची पाटी...

' या बंगल्यातील सगळे रहिवासी शाकाहारी आहेत... फक्त आमचा कुत्रा सोडून.'

******

४. आणखी एका बंगल्यावरची पाटी...

' सेल्समनचे स्वागत. कुत्र्याचं अन्न (डॉग फूड) किती महाग झालंय हल्ली.'

******

५. आणखी एका बंगल्याच्या दारावरची पाटी...

' आम्ही आमच्या दारात येणाऱ्या दर तिसऱ्या सेल्समनला गोळी घालतो... दुसरा आत्ताच येऊन गेलाय.'

******

६. डोळ्यांच्या डॉक्टरच्या दारावरची पाटी...

' तुम्हाला जर हे लिहिलेले नीट वाचता येत नसेल, तर तुम्ही योग्य जागी आलेले आहात.'

Post a Comment Blogger

 
Top