मी खुप काही केल,
मी खुप काही केल, ,
फक्त तुझ्यासाठी .

माझ वागन देखिल बदलल
रागित स्वभाव सोडून ,
शांत स्वभाव केल,

कारण तुझ्या रागावर माझा राग म्हणजे
तापलेल्या तव्यावर शिम्पडलेले पानी.

मी प्युर वेजेटेरियन ची 
नॉन -वेजिटेरियन झाले ,
त्रास झाला थोडा ,पण केल
फक्त तुझ्यासाठी.

पाउस म्हणजे माझा जिव होता पण
तुला चिखल- पाउस आवडत नाही म्हणून,
मी पावसात ओल-चिम्ब होणे सोडून दिल आहे ,
फक्त तुझ्यासाठी.

मी दिलेली वस्तु जपून ठेवायची,
अशी माझी ताकीद असायची,
माझी वस्तु हरवल्यास मी कधी त्या व्यक्तीला
पुन्हा काही दिले नाही .

पण मी तुला देत राहिले 
आणि तू हरवत राहिला ,
आणि तरी मी तुला देतच राहिले.
फक्त तुझ्यासाठी .

माझ्या जीवनाच्या शब्दकोशात ,
कधी नसलेला शब्द ''प्रेम ''
माझ्या हृदयाने कोरुन लिहिला आहे,
फक्त तुझ्यासाठी .

मी तुझ्यासाठी मला पूर्ण बदलल ,
पण तू माझ्यासाठी कण भर सुद्दा
बदलला नाही??
आणि हां प्रश्न मी तुला कधीच केला नाही ,
कारण मी तुझ्यावर ''प्रेम'' केल
फक्त ''तुझ्यावर प्रेम केल''...

Post a Comment Blogger

 
Top