प्रेम करण खुप सोप आहे...काय लागत प्रेम करायला??
एकदा I Love You म्हनल की झाल??
मी तुला आयुष्यात कधीच सोडून जाणार नाही हे promise करायला कीती सोप आहे...
पण जेंव्हा ते खर करून दाखवायची वेळ येते तेंव्हा मग अचानक विसर पडतो त्या सर्व promise चा...
promise देण्यासाठी काय लागत हो ??? काहि दिवसानी तर हा पण विसर पडायला लागतो की कधी तरी कोणाला तरी काहि तरी promise केल होत...
मला आज पर्यंत हे समजलच नाही की जुनी नाती तुटली म्हणुन काहि नवीन नाती जोडायची आणी पुन्हा जुने लोक भेटले की नवीन नाती तोडायची...
या जोड़ा जोड़ी आणी तोडा तोडीच्या खेळामधे कोणाचा तरी जिव जात असतो याच कोणाला काहीच देन घेन रहिलेल नसत,
अश्या वेळेस मग आठवतात ती promise आणी मग ते आठवत असताना हेच कळत नाही की यावर हसायच की रडायच??
का वागतात अशी लोक????
आणी अशा वागन्याला आपन मस्तपने प्रेम म्हणतो..
याला जर प्रेम म्हनत असतील तर त्याला शहानपना म्हणायचा की मुर्खपना? हे ज्याच त्यानीच विचार करायला हवा...
एखाद्याला सोडून जान खुप सोप असत पण ती व्यक्ति गेल्या नंतर होणारा त्रास सहन करताना कीती त्रास होतो हे त्याना काय समजणार???
म्हणुन सांगतो मित्रहो...प्रेम जेवढ़ सुन्दर वाटत तेवढ ते सुन्दर नाही...
त्यासाठी मस्त मित्रा बनवा आ़नी आयुष्याची मजा घ्या
कारण निखळ मैत्री ही एकच गोष्ट अशी आहे की तिथे ना कोणी कोणाला सोडून जाण्याची भीती आहे ना कोणाला काहि खोटे खोटे promise करायची गरज,
प्रेमाला करा राम राम आणी सुरु करा एक निखळ मैत्रीचा नवा प्रवास जिथे कोणतही दुःख नसेल...
असेल फक्त जीवन जगण्याचा आनंद आणी तो आनंद घेतलेल्याच एक प्रामाणिक समाधान...
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook