तुला आवडणारा पावसाळा
आता जवळ आलाय
पण तु ...
तु मात्र दुर गेलीस
गेल्या पावसाळ्यात
कोरडी ठेवलेली छत्री
यंदा मात्र भिजणार....
आणी गंमत म्हणजे
ती छत्री आता मीच संभाळणार ...
आठवतय ... पाऊस आल्यावर
तु नेहमी छत्री पकडायचीस
आणि मी .... मी तुला पकडायचो,
अगदी घट्ट ...
त्या इवल्याशा छत्रीचही झूकत माप
तु मलाच द्यायचीस
आणी स्वतः मात्र भिजत चालायचीस ...
त्या पावसाचही तुझ्यावर तेवढच प्रेम
जणू तुझ्यासाठीच तो यायचा
भिजलेल्या कमरेवर हात गेला
की त्या ढगांचा गडगडाट व्हायचा ...
गेल्या वर्षी पाऊस गेला
आणी पाठोपाठ तुही गेलीस ...
आता आली आहेस पण
पाऊस येण्याआधीच निघालीस ...
तुला जायचय तर जा
मी नाही म्हणत थांब
पण त्या पावसाला काय उत्तर देउ
ते तरी सांग ....
तु मला फ़सवलस हे
मी त्याला नाही सांगणांर
पण काही केल तरी या
डोळ्यातल्या सरीं नाही थांबणार
पाऊस आला तरी , नाही आला तरी
मला मात्र यंदाच्या पावसात
भिजावच लागणार .........
Post a Comment Blogger Facebook