त्या प्रेमाची संवेदना जाणून घेणे मला पसंद नव्हत
पण आज मी त्या प्रेमाच्या प्रत्येक कश्यासाठी आतुरलेला असतो
म्हणूनच या प्रश्नाचे उत्तर शोधतो
की मी का बर तुझ्यावर एवढ प्रेम करतो?
त्या चंद्रावरही डाग आहेत हे मला कधी जाणवलच नव्हत
पण आता तो प्रत्येक डाग ही मला सुंदर भासतो
म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
त्या सूर्याचे तेज मला कधीच उमगाल नव्हत
पण आता त्याच्या प्रत्येक किरणात मला तुझा सहवास भासतो
म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
त्या फुलाच आणि भवरयाच नात खरच मला भावल नव्हत
पण आता त्या वेड्याला पाहून मी हसन देखील विसरून जातो
म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
त्या कमळावरच्या पानावरचा थेंब पहाणे माझ्यासाठी नवल नव्हत
पण आता मात्रा त्या प्रत्येक थेंबात मे माझ अस्तित्व शोधत फिरतो
म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
त्या गर्दीत चालताना चेहरे पाहाण कधीच गरजेच नव्हत
पण आता प्रत्येक चेहर्यात केवळ तुझाच चेहरा शोधत फिरतो
म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
आरशात पाहाण मला कधीच सुखवत नव्हत
आता माझ्या प्रतिबिंबात ही मी केवळ तुझच रूप शोधतो
म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
त्या वाऱ्याच्या स्पर्शने मला कधीच मोहक वाटल नव्हत
आता तोच गार वारा प्रत्येक क्षणी तुझ्या स्पर्शाची जाणीव करून देतो
म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
त्या आकाशातला दूरचा तारा पाहाण मला कधीच पसंत नव्हत
आता त्या त्याशी देखील संवाद साधण्याचा मी करतो
म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
ह्या हृदयाच स्पंदन मी कधी ऐकल नव्हत
पण आता त्या प्रत्येक स्पंदनातून तुझेच नाव ऐकतो
म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
Post a Comment Blogger Facebook