कुठेपर्यंत आले आहे मी | ||||||
तुझ्या सोबत तुझ्या नकळत | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
हे डोळे फक्त तुझीच वाट बघत आहे रात्रदिवस | ||||||
थकलेत् रे ते | ||||||
त्याना एकदा अलगद तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
तुझ्या नसन्याने तुझ्या असण्याचे महत्व कळला आहे मला | ||||||
तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व | ||||||
सगळ सगळ मान्य मला | ||||||
पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय | ||||||
ते बघून तर जा जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
हा चंद्र सुद्धा हसतो मला | ||||||
म्हणतो, ज्याला तू आमच्यात शोधत असत्तेस रात्र रात्र | ||||||
तोही तुझ्यासाठी झुरततोय का असाच | ||||||
त्या चंद्राला उत्तर देऊन तर जा जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
आठवण तुलाही येते माझी | ||||||
पापणी तुझी ही ओलवते अश्रूनी | ||||||
त्या अश्रूना माझ्या ओंज़ळीत देवून तर जा जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
तुझ हसण तुझ बोलण | ||||||
तुझा राग तुझ गप्प राहण | ||||||
घेऊन गेलास तुझ्याबरोबर तू सर्व | ||||||
ज़गण्यासाठी तेवढेच आहे रे माझ्याकडे | ||||||
माझ जगण देऊन तर ज़ा जरा... | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
माझ्या ज़वळ थोडा बसतर जरा | ||||||
माझा सहवास, माझा श्वास, माझी सोबत | ||||||
अनुभव तर जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
प्रेमात म्हणे न सांगता न बोलता | ||||||
सर्व काही कळत | ||||||
मग न सांगता न बोलता | ||||||
मला समजून तर घे जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
तुझ्यात स्वत:लाच हरवून | ||||||
बसले मी कुठेतरी | ||||||
जरा येऊन मला माझेपन | ||||||
शोधून तर दे जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत | ||||||
माझ्या प्रत्येक क्षणात तू आहेस | ||||||
व्यापून टाकल आहेस तू मला | ||||||
माझा एक एक क्षण | ||||||
मला परत देऊन तर जा जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
एकदा, फक्त एकदाच माझ्या मनात डोकवून तर जा | ||||||
स्वता:लाच बघितल्यावर कस वाटत | ||||||
ते सांगून तर जा जरा... | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
अळुवा वरच्या थेंबासारखा आहे रे हे आयुष्य... क्षणभंगुर | ||||||
कुणी ते पाण हलवण्या आधी आणि तो इवलसा थेंब कुठेतरी लुप्त होण्याआधी | ||||||
एकदा प्रेम करुन तर जा जरा... | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
शेवटचा थोडासा थांब | ||||||
कसलीही अपेक्षा नाही... की कासलही बंध नकोत | ||||||
प्रेम केल आहे तुझ्यावर... त्यात कसले व्यवहार नकोत | ||||||
भावनाच फक्त कळतात रे मला | ||||||
त्याचा पलिकडचे काहीही नको | ||||||
एकदा त्या भावनाना स्पर्शून तर जा जरा | ||||||
थोडासा थांब बघतर जरा | ||||||
ह्या वेडीला थोडस शहाणपण शिकवून तर जा जरा. | ||||||
थोडासा थांब बघतर जरा |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook