कधी नाही ते बोललो मैत्रिणीला
जाऊ कुठेतरी सिनेमा पाहायला
खूप विचार करून म्हणाली
वेळ मला दे विचार करायला
जुन्या मैत्रीलाही पाहा
विचारांच्या भिंती लागतात
कुणाला सांगणार
सगळीच मुले लोफर नसतात...
मागे एकदा गेलो पार्टीला
प्रत्येकजन पिऊन आर्नोल्ड झाला
संभाळत बसलो उडनाऱ्यांना
आणि सगळा वास आमच्या शर्टाला
आमच्या बदनामीचे किस्से
नंतर आम्हालाच ऐकावे लागतात
कुणाला सांगणार
सगळीच मुले लोफर नसतात...
कामाचा आजकाल लोड वाढलाय
खुपदा होतो उशीर निघायला
घरुन तरीही एकच प्रश्न
असतोस कुठे इतका वेळ
परके नाही पण आपलेच जेंव्हा
प्रश्न असे काही विचारतात
कुणाला सांगणार
सगळीच मुले लोफर नसतात...
सगळीच मुले लोफर नसतात...
Post a Comment Blogger Facebook