सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही
कितीही वाटलं तरी करवत नाही
कुणी काही सांगितल तर एकवत नाही
अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच कळत नाही .

चटके कितीही बसले तरी ओरडत नाही
आपल्यानीच तोडल तरी दुरावायला तयार नाही
अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येतनाही.
माझं मन हे असं का ? कुणालाच उमजत नाही .

निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही
कितिही केलं तरी केलं कुणी म्हणतच नाही
वाटतं मी कोणाचा कोण राहिलोच नाही

कारण कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच समजत
नाही.



Post a Comment Blogger

 
Top