आठवतो आपला श्वास जसा
एकमेकांत मिसळला होता
भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात
कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता

वाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तर
इतकं दुःख सोसावं लागेल
आज पर्यंत श्वासांनी मला, पण
यापुढे त्यांना पोसावं लागेल

तुझ्या आठवणींच्या साखर झोपेत
माझी कालची रात्र गोडव्यात सरली
पुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पण
काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली


'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला

माझं दुःख बघवलं नाही
म्हणून एक ढग रडत होता
तुमचं आपलं काहीतरीचं
म्हणे तेंव्हा पाऊस पडत होता

Post a Comment Blogger

 
Top