आज आमच्या गुलाबाला कळी आली
आज आमच्या गुलाबाला कळी आली
दिवस खूप छान होता तिचा अनंत चतुर्दिशीचा


******एक होती कळी******

डोके वर काढून जग पाहत होती.......
वार्‍या वर डोलात होती....
उन्हात खेळात होती.....
पावसात भिजत होती.....
काट्या मधे उभी राहून हसत होती
तोल जाताना सावरत होती.....
प्रेमाचा आनंद घेत होती.....

सगळे तिला बोलत
खूप छान आहे ती....
खूप सुंदर आहे ती ....
खूप नाजूक आहे ती....
खूप गोंडस आहे ती...

पण सायंकाळी .....
बाबा ने तिला गणपती च्या स्वाधीन केले..
गणपती बरोबर नाचत नाचत ती आमच्या घरा बाहेर पडली.....
आणि नदीच्या पाण्या बरोबर वाहून गेली.....

जाता जाता बोलली मला अजुन जग बघायचे होते....!!!
अजुन खूप आनंद घ्यायचा होता .......!!!!
प्रेमाचे हे सुंदर जग मला अजुन पहायचे होते...!!!


Post a Comment Blogger

 
Top