तू सहजच बोलून जातेस
तू सहजच हसून जातेस
दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा
मात्र मलाच लागून राहते

धडधड या हृदयाची
थांबता थांबत नाही
तुझ्यासाठी जगण्यासाठी
मी थांबवतही नाही

कधी नकळत फुलांमधूनी
भ्रमर बनून जाताना
हा हवेत दरवळणारा
मन सुगंध झेलताना

वाटे सुंदर जीवन आहे
आपुल्याही वाटेवरूनी
की क्षणात निघुनी जाते
ती ही वाट सरूनी

तू सहजच बोलून जातेस
तू सहजच हसून जातेस
नि या मनवेड्याला प्रतीक्षा
कशाची लागून रहाते?

Post a Comment Blogger

 
Top