इंग्रजी

लहानशा गावातले गंपूराव पहिल्यांदाच परदेश प्रवास करून अमेरिका बघून परतले .

झंपूराव : काय मग , कशी वाटली अमेरिका ?

गंपूराव : एकदम भारी ! अमेरिकेतली अगदी लहान लहान मुलं पण काय फाडफाड इंग्लिश बोलतात .
...........

खसखस

मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली .

शेजारणीने मराठी बाईला विचारले , दोपहरको क्या करती हो ?

मराठी बाईने उत्तर दिले , थोडा गिरती हूँ !

क्या

हा हमारे यहा पे सब लोग दोपहरको थोडा थोडा गिरते है

.................
वडापाव

गंपू : एका माणसाचा वडापावचा व्यवसाय होता . तो सहा रुपयांना वडापाव विकत घ्यायचा आणि तीन रुपयांना विकायचा . तरीही तो कोट्यधीश झाला .

झंपू : हे कसं शक्य आहे ?

गंपू : सोप्पंय , आधी तो अब्जाधीश होता .
.................

साक्षीदार

बँकेचे व्यवहार सुरळीत चालू असताना अचानक आवाज येतो , ' हॅण्ड्स अप !' पुढच्या काही मिनिटांत तो माणूस बंदुकीच्या धाकावर बँक लुटतो . झटकन वळून बाजूच्या ग्राहकावर दरडावतो , ' तू बघितलंस मला बँक लुटताना ?' तो म्हणतो , ' अं ... अं .. हो !' बंदूकधारी त्याला ठार करतो . मग त्याच्या बाजूच्या माणसावर आवाज चढवतो , ' तू बघितलंस मला ?' तो उत्तरतो , ' नाही , पण माझ्या बायकोने बघितलं !'

........

कॉफी

गंपू आणि गंपी हॉटेलात कॉफी मागवतात .

गंपू : गरम आहे तोपर्यंत पिऊन टाक .

गंपी : का ?

गंपू : मेन्यू कार्ड नाही बघितलं का ? साधी कॉफी १५ रुपयांना आहे आणि कोल्ड कॉफी ६० रुपयांना !


-.....................
ढग्गोबाई

नू भल्या मोठ्या लोखंडी कढईत जिलबी तळत बसला होता. सगळीकडे जिलेब्यांचा मस्त घमघमाट सुटला होता. आणि तो मोठमोठ्याने ओरडत होता...

नानू : या या...बटाटे घ्या... बटाटे ताजे ताजे बटाटे

बंडू : ए नान्या... तू इथं सरळ सरळ जिलबी विकतोयस आणि बटाटे घ्या बटाटे... अशा बोंबा काय मारतोयस रे?

नानू : ए गप बस... जिलबी नाही, बटाटेच बोलायचं. अरे, माशांनी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल ना...

**************************

जाता जाता...

एका माणसाकडे दोन गायी असतात. पण दूध मात्र त्यातली एकच गाय देत असते.

का?

सोप्पंय... कारण दुसरी गोगलगाय असते.



Post a Comment Blogger

 
Top