माझ मलाच कळत नाही काय घडतेय
जेवढे सावरतोय तेवढेच बिघडतेय,
सावली माझ्या पुढयातच आहे, मी तिला पकडायला पाहतोय,
पण सावलीच मला म्हणतेय तू वाकलातरी कमी पडतोयस ,
म्हणून माझ्या सावलिला टालायच बघतोय,
पण जेवढे सावरतोय तेवढेच बिघडतेय,,
अळवाच्या पानावर जमलेले पाण्याचे थेंब मी पाहतोय,
पण पानावरचे थेंबच मला सांगतायेत मी पानावर असून नाहीये,
म्हणून त्या थेंबाना पानावरून हातावर घेऊन पाहतोय,
पण पाणीच ते, ते ही पाझरून जातेय.
दूरवर दिसणार्या क्षितिजाला अगदी थोड्या अंतरावर् पाहतोय,
पण क्षितिज ही मला म्हणतेय मी ही असाच भटकतोय,
वाटेत भेटणार्या प्रत्येकाला याचे रहस्य विचारतोय,
पण प्रत्येकजण मला प्रेमासाठी वेडा ठरवतोय,
सुख असून दुखावलेलो,
दुख नसून हारपलेलो,
माझ मलाच कळात नाही,
मी कशासाठी बेभान झालो.
आभार
कवी: प्रशांत पांचाळ
ईमेल: Bhq.housekeeping@relianceada.com

Post a Comment Blogger Facebook