तुझी आठवण आता येत नाही मला
तुलाही मी आता आठवत नसेन

तरीही पाऊस पडला की बाहेर बघ
मी तुझीच वाट पाहत असेन

पावसात तुला दिसणार नाहीत अश्रू
अलगद जेव्हा मी तुझ्याजवळ बसेन

आठवतील मग मला तुझे शब्द
राग येऊन मग मी तुझ्यावर रुसेन

आनंदात मग मी तू भेटल्यावर
माझे डोळे हलकेच पुसेन


तु विसरु शकणार नाहीस
कलंडता सुर्य, लवंडती सांज
पक्षांच्या माळा, किणकिणती सांज

तु विसरु शकणार नाहीस
सोनेरी उन, वा-याची धुन
पावलांची चाहूल, ओळखीची खुण

तु विसरु शकणार नाहीस
दिलेला शब्द, ओझरता स्पर्श
दडलेले प्रेम, ओसंडता हर्ष


तु विसरु शकणार नाहीस
भिजलेले डोळे, विरलेली स्वप्नं
भिजलेली वाट, उरलेले प्रश्न

तु विसरु शकणार नाहीस
आणि मी ही विसरु शकणार नाही

Post a Comment Blogger

 
Top