रोज तिथे एकांतात रडतो मी...
रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी
विसरून जाइन तुला समजून किती रडलो मी
का तूला आठवू... हाच विचार करतो मी
अळव्यावरच्या थेम्बा प्रमाने क्षण क्षण मरतो मी...

नाही कधी जाणार आपण भेटायचो जिथे
मनात माझ्या रोज ठरवतो मी
तुझी अनुपस्तिथि असल्याने जीवनात
रोज तिथे एकांतात रडतो मी...

नको दिसावा तुझा चेहरा
रोज देवास पाया पडतो मी
पाकिटात्ला तुझा फोटो फाड़तान्ना
गलात्ल्या त्या खलीवर रडतो मी...

एकपण वस्तु तुझी का ठेवावी जवळ
म्हणुन कपाटातल्या सरव्या वस्तु काढतो मी
प्रत्येक वस्तु एकदा ह्रुदयाला लाउन
मुक्त कंठाने रडतो मी...


Post a Comment Blogger

 
Top