एकदा मला आकाशात एक परी दिसली
हसली बघून माझ्याकड़े
म्हणते कशी मला.....
माग काय हव ते
मी म्हणालो...
सुन्दर आयुष्य दे मला
जिथे असेल फ़क्त सुख
नसेल कोणतही दुःख
ती म्हणाली देते
पण परत तक्रार नाही करायची....
अणि झाल ही तसच
सुख, सुख अणि नुसत सुख
ना घरात जागा, ना मनात...
सुख कुठेच मावेना
शेवटी अश्रु आले डोळ्यात
माझ रडू ऐकून
परी आली धावून
म्हणते कशी सुखात का रडतोस ?
तिला काय सांगायच तेच कलेना
सुखच दुखते आपल्याला तेच उमगेना..
तीला म्हणालो तुझ सुख घे
थोडस का होईना मला दुःख दे
दुखाशिवाय काय किमत सुखाची....
कडू अणि गोड दोन्ही.. चव चाखु देना आयुष्याची ..........................
Post a Comment Blogger Facebook