मन माझे तुझ्याकडे आहे,
कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात
वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.
प्रेमाच्या
गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार
झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.
क्षण काही जगलोत सोबत
आठवणीत
त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात
माझ्या बुडून बघ.
स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते
माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न
पाहून बघ.
जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी
तर वेडी झालीच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडा होऊन बघ.
जसा
तू सामावलायस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळा
अन् मी वेगळी
एकरूपता तरी जाणवेल बघ.
नाही करणार एवढे प्रेम
दुसरे कोणी
हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला
जगी
तुझ्या मला असू दे बस्स !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook