दु:खानंतर सुख आल्यावर
माणूस जरा गोंधरतो
"असं अचानक सुख का?"
असं देवाला विचारतो
आधीतर दु:खी माणसाला
सुख ओळखताच येत नाही
नशिब इतकं दयावान का?
याचं कारण कळत नाही
दु:खाची सवय झाली की
सुख विचित्र, नकोसं वाटतं
नशिबाने दाखवलेली दया
स्वाभिमानाला सुख नकोसं वाटतं
"आपण आपल्या दु:खात बरे, या
उशीरा येणाऱ्या सुखाची गरज काय?
कदाचित आपण सुखाच्या लायक नाही
अशा हावरटपणाची गरज काय?"
खरंतर देवाने दिलेलं हे बक्षिस
आपण प्रेमाने स्विकारायचं असतं
पुढे परत हवंतेवढं दु:ख
दोन क्षण सुखात जगायचं असतं
Post a Comment Blogger Facebook