कधी कधी मनात, बरच काही असुनही,
सत्यात ते कधीच येत नसतं,
अन कधी कधी, मनात काही नसतानाही,
बरच काही घडत असतं !!

पण, प्रत्येकवेळी मन बिचारं त्याचं,
फ़क्त तिच्यासाठीच झुरत असतं..

मनात त्याच्या असुनही,
तो तिला साद देत नाही,
अन त्याने, साद दिलीच नाही,
म्हणुन तीही प्रतिसाद देत नाही,..

साद-प्रतिसादाच्या खेळातुन या,
कुणालाच काही मिळत नसतं,
पण, दोघांमधल प्रेम मात्र,
एकटच बिचारं रडत असतं .!!..

स्वप्नं पहाटेची म्हणे, सर्वांचीच
खरी होत असतात,
मग 'आपलीच' स्वप्नं अशी
धुळ खात का पडतात ?

पहाटेच सोडाच, रात्रं-दिन क्षणभरही,
डोळ्याआड तिचं, जाणं नसतं,
म्हणुनच कदाचीत, डोळ्यांतल्या आसवांच,
मनाच्या उताराकडेच, धावणं असतं,
अन, बिचाय्रा मनाच्या नशीबी,
एकटक सगळं पहाणं असतं...

कधी कधी मनात, बरच काही असुनही,
सत्यात ते कधीच येत नसतं,
अन कधी कधी, मनात काही नसतानाही,बरच काही घडत असत...

Post a Comment Blogger

 
Top