मित्र-मैत्रीणींनो नशीब असावे तर ते तुमच्यासारखे,
तिची मैत्री मिळवण्यासाठी !
मित्रांनो कदाचित तुम्हाला जाणीवही नसेल,
मी मात्र तरसतो आहे अशा नशीबासाठी !!
ती कदाचित तुम्हाला,
येता-जाताही दिसत असेल !
मी मात्र तिच्या घराकडे फिरतो आहे,
ती फक्त एकदा दिसण्यासाठी !!
मित्रांनो कदाचित तुम्हाला जाणीवही नसेल,
मी मात्र तरसतो आहे तिला डोळे भरुन पाहण्यासाठी !!
तुम्ही कदाचित अगदी सहज,
तिला नावने हाक मारत असाल !
माझा मात्र नेहमीच ह्रदयाचा ठोका चुकतो,
मनातल्या मनातही तिचे नाव घेण्यासाठी !!
मित्रांनो कदाचित तुम्हाला जाणीवही नसेल,
मी आतुरतेने वाट पाहतो आहे तिच्या ओठांवर माझे नाव येण्यासाठी !!
तुम्ही कदाचित दिवसभर,
तिच्याशी मनसोक्त गप्पा मारत असाल !
मी मात्र वर्षे घालवली आहेत,
तिच्याशी फक्त एकदा बोलण्यासाठी !!
मित्रांनो कदाचित तुम्हाला जाणीवही नसेल,
मी अक्षरश: व्याकुळ आहे तिला हे सर्व सांगण्यासाठी !!
ती जर कधी भेटली नाही,
तर तुम्ही कदाचित फोनवरही बोलत असाल !
माझे मात्र आजही हात थरथरतात,
तिच्या फोनचा पहिला नंबर ही दाबण्यासाठी !!
मित्रांनो कदाचित तुम्हाला जाणीवही नसेल,
मी मात्र तरसतो आहे तिचा फक्त आवाज ऎकण्यासाठी !!
नशीबवहीत लिखाण करताना,
ब्रम्हदेव ही कदाचित गोंधळला असेल !
तुम्हा सर्वांच्या वहीत थोड्या-थोड्या लिहिल्या असतील,
ज्या ओळी होत्या माझ्या लिखाणासाठी !!
मित्रांनो कदाचित तुम्हाला जाणीवही नसेल,
मी वाट पाहतो आहे एक दिवस का होईना तिच्या सोबतीसाठी !!
ती माझी प्रेयसी किंवा मैत्रीण नाही,
याची याच काय कुठल्याच जन्मी मला हरकत नसेल !
माझ्या पावलोपावली च्या शुभेच्छा भरपुर आहेत,
तिला कुठल्याही दुःखापासुन दुर ठेवण्यासाठी !!
मित्रांनो याची जाणीव असु द्यात नेहमी,
कोणीतरी आजही मरतो आहे तुमच्या मैत्रीणीसाठी !
तिला दुःखाचा आभास ही होऊ देऊ नका,
कोणीतरी तिच्या नशीबाची ही दुःखे झेलतो आहे तिला खुष ठेवण्यासाठी !!
खरचं पण नशीबच हवे असते नशीब मिळवण्यासाठी,
मी मात्र नेहमीच तरसत राहील तुमच्या सारख्या नशीबासाठी !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook