सांग सांग सांग शोना सांग..!
मनीमाऊच्या स्वप्नात काल,
कोण आलं होतं सांग..

फुलपाखरांनी केली का..
तुझ्या संगे मस्ती..?
डोलणाऱ्या फुलांशी..
तुझी झाली का दोस्ती..?

सांग सांग सांग शोना सांग..!
मनीमाऊच्या स्वप्नात काल,
कोण आलं होतं सांग..

गालावरच्या खळीत..
उमलली कळी..!
ओठांच्या ताटव्यात..
खसखस पिकली..!

सांग सांग सांग शोना सांग..!
मनीमाऊच्या स्वप्नात काल,
कोण आलं होतं सांग..

आठवणींच्या विमानाने..
कुठे गेली होती स्वारी..?
की आकाशीचा चांदोमाच
आला उतरून खाली..?

सांग सांग सांग शोना सांग..!
मनीमाऊच्या स्वप्नात काल,
कोण आलं होतं सांग..

काही असो..
खूश होती भलतीच स्वारी..!!
चांदण्यांची बरसात..
झाली इथे खरी.

Post a Comment Blogger

 
Top