कवीता म्हणजे ......
मनावरउमटलेले भावनांचे सुरेख प्रतिबिंब
अवचीत मिळणारा एखादा भावक्षण
स्वतःला हरवण्याचा नाजुक क्षण
भावनांच्या हिंदोळ्यांवर खेळणारे मन
जे कवीता करतात
ते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात
कधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात
मनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात
कवीता असतात,नाजुक फुलासारख्या ,
फुलल्या की आनंद देणारया
सुंदर दवबिंदुंसारख्या
मनाला सहजच भावणारया ,
कवीता विचार करायला लावतात
काही थोडेफार रडायलाही लावतात
काही मने जूळवतात
काही नाती बनवतात
काही भावना व्यक्त करतात
काही रोष व्यक्त करतात
समाजातील वाईट गोष्ठींवर काही वेळा प्रहारही करतात
कवीता शब्दांपासुन सुरु होतात
व शब्दांवरतीच संपतात
पण
संपता संपता ते
आयुष्याला एक ध्येय देऊन जातात
भावनांचे रंग मनावर असे चढतात की
ते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात
म्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात........................
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook