मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

खूप सोप असत इथे हातात हात घालून रानोमाळ भटकायला,
तर कधी नीजून तीच्या मांडीवर पुनवेचा चंद्र बघायला,

शब्दही सापडतात अलगद इथे तीची स्तुती करायला,
संधीही नाही मिळत तीला मग खोटे खोटे ही रुसयला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत ख-या आयुष्यात ते जगायला,

नाही लागत परवानगी कुणाची सिनेमा बघायला,
खूप मजा येते यार इथे बाइक वर फिरायला,

तीचाही असतो होकार नेहमी माझ्या मीठीत यायला,
कशाचीच उपमा नाही दोस्तांनो तीच्या कुशीत नीजायला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत ख-या आयुष्यात ते जगायला,

........पण काय सांगू मित्रानो तीचाच एस एम एस येतो शेवटी,
मला स्वप्नातून जागे करायला...!

Post a Comment Blogger

 
Top