माझ कोकण....
आम्ही कोकणी कोकणी
साधी भोळी हो माणस
यावे एकदा कोकणात
खाया हापूस, फणस
रम्य सागरी किनारा
माझ्या कोकणात असे
संथ वाहती सरिता
निसर्ग नटलेला दिसे
शेता मधे राबता
बळी राजास पहावे
घाम गालूनी काम
त्यास एवढेच ठावे
गोड चटणी भाकर
नाही कसलीच सर
लिहिता कोकणा वरी
भरूनी येतो उर
दाट इथे वनराई
अंगणा फुले जाई जुई
कोकिळा सुस्वरे आळवी
पान्हा फुटतसे गाई
लोक आनंदी राहती
सण साजरे होती
एकमेका सुख दु:खा
सारे मिळुनी जमती
अनमोल ती माती
पिके भरघोस येती
स्नेह भाव प्रतेकात
किती मायळू ती नाती
मॅंदिरी घंटा नाद
भक्त देवा घाली साद
गाजर हरी नामाचा होई
सर्व आनंदी आनंद
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook