तू
अलगद
हात
धरलास

नि
खांद्यावर भार टाकलास

तू
सावरलसं तुझ्या केसांना

पण
चेहरा माझा झाकलास

तू
अलगद
हात
धरलास

स्वप्नांचा मी राजा झालो

ह्या
धगधगीच्या जिवना पासून

काही
क्षण
वजा
झालो

तू
अलगद
हात
धरलास

एक
वेदना काळजात शिरली

मी
काही
बोलणार इतक्यात

शब्दाविणा कविता अवतरली

तू
अलगद
हात
धरलास

स्पर्शात मी मिसळून गेलो

चिखलात रुतलेला मी कमळ

देव
चरणांच्या जवळून गेलो

तू
अलगद
हात
धरलास

मी
झेलल्या चांदण्यांच्या गारा

तू
रेषां मध्ये हरवलीस

मी
रचला
भविष्य सारा

तू
अलगद
हात
धरलास

मी
कल्पनेत बुडत गेलो

माझ्या वास्तवाची झालीस सावली

मी
काट्यां मध्ये बागडत गेलो

तू
अलगद
हात
धरलास

काय
बोलावे तेच सुचेना

भावनांचा अख्खा गाव गिळताना

शब्दाचा एकही अंकूर फुटेना

तू
अलगद
हात
धरलास , नि

माझ्या डोळ्यांत हरवून गेलीस

इवलसं घर कुठे बांधायच आहे

तू
डोळ्यात वास्तू ठरवून गेलीस

तू
अलगद
हात
धरलास ,

नि
बोटं
गुंफवलीस बोटात

मनात
माझीच मिरवणूक निघाली

वाजत ,
गाजत
थाटात

तू
अलगद
हात
धरलास , नि

मुक्यानेच मागून गेलीस

हृदयाला स्पर्श करून , का गं

परक्या सारखी वागून गेलीस

तू
अलगद
हात
धरलास , नि

काळजाचा ठोका चुकला माझा

वर
म्हणालीस , “ तुला काहीच नाही कळत ”

अस
का
वागतोस तू राजा

तू
अलगद
हात
धरलास

मी
त्या
क्षणांचा होत गेलो

तू
नसताना जवळी

तुझ्या स्वप्नांचा होत गेलो

तू
अलगद
हात
धरलास

मी
संथ
निथळत वाहणार

तुझ्यात इतका मिसळल्यावर

माझ्याकडे कसा मी राहणार

तू
अलगद
हात
धरलास

मी
श्वास रोखून धरला

पुढचा श्वास मी

तुझ्या श्वासाने भरला

तू
अलगद
हात
धरलास

मी
रंगात भिजून गेलो

आभाळ
कवेत
घेऊन

मी
इंद्रधनूत निजून गेलो

तू
अलगद
हात
धरलास

देह
माझा
जरा
थरथरला

कसा
व कधी , कळलचं नाही

हर्शाचा थवा मनी उतरला

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top