हल्ली फ्रेण्ड/मित्र ही कॉन्सेप्ट जरा बदलली आहे. तुम्हाला नाही असं वाटत? अहो, त्याचं कसं आहे बघा... पूर्वी आपण मित्र कोणाला म्हणायचो?... तर सुखदु:खात आपल्याला साथ देणारी, आपल्याला त्याच्याबद्दल आणि त्याला आपली सगळी माहिती असायची अशा व्यक्तीला आपण मित्र म्हणायचो. हळूहळू काळ बदलू लागला, तशा मैत्रीच्या संकल्पनाही बदलू लागल्या. फ्रेण्ड, बेस्ट फ्रेण्ड, कॉलेज फ्रेण्ड, नेट फ्रेण्ड, चॅट फ्रेण्ड अशा अनेक कॅटेगरीज निर्माण होऊ लागल्या. अमूकतमूक माझा बेस्ट फ्रेण्ड आहे, तर तमूकधमूक जस्ट फ्रेण्ड आहे. अमका कॉलेज फ्रेण्ड, तर तमका नेट फ्रेण्ड असल्याचं सांगत प्रत्येकाला एखादं बिरुद चिकटू लागलं. पण, खरंच मित्रांच्या अशा कॅटेगरीज असतात? एकमेकांचे मित्र म्हणवताना एकमेकांबद्दल, त्याच्या घरच्यांबद्दल फारशी माहितीही एकमेकांना नसते. मग, तरीही अशा व्यक्तींना मित्र म्हणायचं की सहकारी?...
तुम्ही दिसल्यावरच हायहॅल्लो करणारे... जस्ट फ्रेण्ड्
तुम्ही दिसताच हाय हॅलो करणार पण, नाही दिसलात तर काळजीने तुम्ही कुठे आहात याची चौकशी करणारा... बेस्ट फेण्ड्स
; ; ;
जस्ट फ्रेण्डसमोर तुम्ही कधी मनमोकळेपणाने रडला आहात?
मन मोकळं करून रडण्यासाठी बेस्ट फ्रेण्डचाच खांदा असतो.
वादविवाद झाले, की जस्ट फ्रेण्ड्ससाठी मैत्री संपते.
मैत्रीत वादविवाद, भांडणं होतातच!
रात्री उशीरा फोन केला, तर जस्ट फ्रेण्ड्स
डिस्टर्ब होतात.
रात्री उशीरा फोन केला, तर बेस्ट फ्रेण्डला आपली काळजी वाटते.
घरी आल्यावर जस्ट फ्रेण्ड्स फॉर्मली (औपचारिकरीत्या) वागतात.
तर बेस्ट फ्रेण्ड स्वत:ला काय हवं ते हक्काने मागून घेतात/ स्वत:च शोधून घेतात.
तुमच्या प्रेमकहाण्या जस्ट फ्रेण्ड्सना जळवतात, उबग आणतात.
बेस्ट फ्रेण्ड्स तुम्हाला खऱ्या प्रेमाची जाणीव करून देतात.
गरज असते, तेव्हा जस्ट फ्रेण्ड्सना तुमची मदत हवीच असते.
तुम्हाला केव्हाही मदत करण्यासाठी बेस्ट फ्रेण्ड तयार असतात.
एकमेकांना भेटण्यासाठी बिझी शेड्युलमधून जस्ट फ्रेण्ड्सना वेळ काढावा लागतो.
बेस्ट फ्रेण्ड्सच्या बिझी शेड्युलमध्ये मित्रांसाठीही वेळ असतो.
काम असतं, तेव्हाच जस्ट फ्रेण्डस फोन करतात.
केवळ तुमचा आवाज ऐकण्यासाठी बेस्ट फ्रेण्ड्स फोन करतात.
फोनवर बोलण्यासाठी जस्ट फ्रेण्ड्सकडे विषयांची मर्यादा असते.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook