१. पाण्यावरचा प्रत्येक तरंग
माझ्या मनाला भावून जातो
त्या तरंगात गूंतत असतानाच
दूर कुठेतरी तो वाहून जातो
२. इथे प्रत्येकाच्याच आयुष्याला
अनावर असा वेग असतो
उगाचच एक दूसरयाला
मागे टाकायचा रोग असतो
३. मनंच मनाला मोकाट सोडतं
आणि मनंच मनाला आवरत राहतं
विचारांच्या खाईत झोकून देतं
आणि उगीचच स्वतःला सावरत राहातं
४. ही कवितांची वही उघडा
पण जराशी जपून
नाहीतर चाहूल तुमची लागताच
शब्द बसतील लपून
५. त्या धुंद नशेत
आयुष्याचा नाश असतो
दारूच्या एका थेंबासाठी
गहाण प्रत्येक श्वास असतो
६. तुझ्या हातांचा स्पर्श झाल्यावर
लाजाळूचं झाडही पान पसरतं
तुझ्या स्पर्शाने मोहरून जाऊन
पान मिटायलाही ते विसरतं
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook