अजुनही आठवतयं मला
तो लिंबोणीच्या फांदीचा झुला
त्यावर बसून हसत म्हणायचीस..
"मुर्खा, बघतोस काय झुलव ना मला.."
अजुनही आठवतयं मला
तो तुला आवडणारा पाऊस
मला विसरून म्हणायचीस,
"पावसा, बघतोस काय चिंब भिजव ना मला.."
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते फुलपाखरू
त्याकडे हात लांबवत म्हणायचीस..
"पाखरा, बघतोस काय तुझ्या पाठीवर घे ना मला"
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते बेडकाच पोहणं
त्याला हुश्श करून म्हणायचीस..
"बेडका, पाण्याचा ठाव कुठे आहे सांग ना मला"..
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते सोनचाफ्याच झाडं,
त्याला पाहुन लाजून म्हणायचीस..
"चाफ्या, माझ्या लग्नात तुझ्या फुलांची माळ घालीन त्याला.."
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारा तो बर्फाचा गोळा..
तो खाताना ओठांवरून जिभ फिरवत म्हणायचीस..
"गोळावाल्या, अजुन थोडासा गोड कर ना याला"
अन आजसुद्धा तु तशीच आहे,
हे पानीपुरी खाताना पाहीलं
अन तेव्हा माझं मन खरचं,
तुझ्या त्या छकुल्या कुशीला कवटाळत राहीलं...
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook