सर्वांनी सांगितलं

तुझं मन तिच्यापुढे व्यक्त कर

डोळ्यांनी नव्हे तर

शब्दांनी सारं स्पष्ट कर

सल्ला आवडला माझ्या मनाला

उचलला फोन, तिला कधी भेटायचं विचारायला

नंबर तिचा फिरवला

मनाचा समतोअल बिघडला

खरंच का तु सांगु शकशील

तिच्या मनांत नसलं तर

उगाच चांगली मैत्रीण गमावशील

मनाची ही बाजु मनालाच पटली

एक बेल तिच्या फोनची वाजली

नकाराची घंटा माझ्या मनाची खणखणली

दुसरी बेल वाजण्याचे वेळच येऊ नाही दिली
असंच का तु जगशील

सांगितल्याशिवाय मानातलं तिला

कसं तु समजावशील?

भावना तुझ्या सा-या मनातल्या

सांगणं तुला नकार या पैकी

एकच उत्तर तुझे आहे

मनाचं द्वंद्व माझ्या आत चालू झालं

सकारात्मक - नकारात्मक भांडण सुरु झालं

लढाई फारच लांब रंगली

दोन्ही पक्षांच्या विचारांची हानी मात्र झाली

सरतेशेवटी सकारात्मकतेची बाजु जिंकली

उचलुन फोन करावा हीच

बाजु मनाला पटली

उशीर करणे योग्य नव्हते

फोन करणे जरुरी होते

सवयीप्रमाणे बोटे बटणांवर फिरली

लगेचच बेल होनची खणखणली

हॅलो म्हणुन समोरुन कुणीतरी बोलमं

आवाज ओळखीचा, म्हणुन हाय म्हटलं

कुशल मंगल सारं विचारलं

विषय कसा काढु हेच नाही कळलं

दोन्हीकडे मग शांतता पसरली

संधी चांगली होती झटकन स्विकारली

काहीतरी सांगणार आहे मी तुला

सांग लवकर काहीतरी ऐकायचय मला

तु सुंदर आहेस , आवडतेस मला

का ऐवढा वेळ लागला सांगायला तुला

तोंडावर पाण्याची धार कोसळली

गाढ झोपेतुन जाग मला आली

गुलाबी पहाटेची साखरस्वप्ने खरी ठरतात

हेच मला ती रात्र सांगुन गेली

Post a Comment Blogger

 
Top