समोर आलास तू , निखळ हसू घेउन
मनमोकळया गप्पा मारल्या तुझ्या बोलक्या डोळ्यात पाहून
सामान्य होता तो दिवस, तरीसुद्धा सर्वात निराळा
वाटलं नव्हतं तुझ्या रूपात आयुष्याचा सोबती मिळेल मला
नव्हती गाणी, झगमगाट नव्हता
न स्वप्नातल्या राजकुमारासरखा तू घोड्यावर होतास
फक्त होत्या गप्पा आणि अगणित विषय
बोलत राहिलो आपण आणि वेळेचा पत्ताच नव्हता
तुला मनात ठेउन मी घरी परतले
तुझ्या समवेत गेलेल्या वेळेचा विचार करत राहिले
निर्मळ प्रेमळ अगदी मला साजेसा वाट्लास
सहजच ह्रुदयात जागा करून राहिलास
अजुनही तो दिवस आठवतो पुन्हा आपली भेट झाली
परत एकदा भरपूर बोलायची संधी मिळाली
निरागसपणे सांगत होतास तुझ्या मनातल्या गोष्टी
एकरूप होतील का त्या माझ्या आयुष्याशी?
बागडत दुसर्या दिवशी मी तुझ्याकडे आले
नकळत पुन्हा एकदा गप्पांमध्यें गुंतून गेले
सोपवेन कायमचा हात तुझ्या हातात
देशील का अशीच आयुष्यभराची साथ?
सगळी कोडी सुटली आणि मी तुझी झाले
एकमेकांपासून दूर असण्याचे क्षण सुद्धा नाहीसे झाले
जीवनातील दुःख आता तुझ्या सोबत विरघळतात
आनंदाचे क्षण मोहरून खुलतात

Post a Comment Blogger Facebook