एका गरीब माणसावर एका सावकाराचे मोठे कर्ज होते आणि ते फेडणे त्याला शक्य नव्हते. नेहमीप्रमाणे तो सावकार कुरूप, दुष्ट आणि लंपट वृत्तीचा म्हातारा होता आणि त्या गरीब माणसाला एक सुंदर मुलगी होती. तिच्याशी त्याचे लग्न लावून दिले तर तो सारे कर्ज माफ करून देईल अशी लालूच त्याने दाखवली आणि नाहीतर त्याच्याविरुध्द तक्रार करून त्या गरीब माणसावर जप्ती आणेल, त्याला तुरुंगवास घडवेल अशी धमकीही दिली. आपल्याला कोणी वाईटपणा देऊ नये म्हणून त्या लबाड माणसाने एक प्रस्ताव मांडला. जे कांही होईल ते देवाच्या मर्जीप्रमाणे होऊ दे असे सांगून त्याने असे सुचवले की तो एक पांढरा खडा आणि एक काळा खडा असे दोन खडे एका थैलीत घालेल. त्या मुलीने न पाहता त्या थैलीत हात घालून त्यातला एक खडा बाहेर काढायचा. दैवाच्या योजनेनुसार तो काळा निघाला तर तिने त्या सावकाराशी लग्न करायचे आणि कर्जातून मुक्ती मिळवायची. तिच्या सुदैवाने तो पांढरा निघाला तर तिने लग्न करण्याची आवश्यकता नाही आणि तरीही ते कर्ज माफ होईल. तिने कोणत्याही कारणास्तव नकार दिला तर मात्र तो सावकार सरकार दरबारी तक्रार घेऊन जाईल. तुम्ही त्या मुलीला काय सल्ला द्याल ?
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

...
.
..

.
.
ते जाऊ दे, तिने काय केले असेल?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
त्या सावकाराने लबाडीने दोन्ही काळेच खडे त्या थैलीत टाकले होते हुषार मुलीने पाहिले होते. तिने डोळे मिटून एक खडा काढला आणि डोळ्याचे पाते लवायच्या आंत तो हांतातून खाली पडू दिला. खालच्या खड्यांनी भरलेल्या रस्त्यातल्या इतर कड्यात मिसळून तो दिसेनासा झाला. मग ती म्हणाली, "अरेरे, मी हा कसला धांदरटपणा केला? पण हरकत नाही. तो दुसरा खडा तर थैलीत सुरक्षित आहे. तो पाहूया, तो काळा असेल तर त्याचाच अर्थ मी काढलेला खडा पांढरा होता."




Post a Comment Blogger

 
Top