( तो हातात गुलाब घेवून , चेहर्यावर क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो ) पुढे ...
तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून जाईन .
तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आणि तू मला झिडकारतेस ,
खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम करतेस ?
ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची गरज असते?
माझे तूझ्यावर प्रेम असते तर , तूला जायाला सांगीतले नसते
तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस ,
ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस
ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत दिसते,
तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण येते
तो - मग रोज घरी जाताना मागे का वळ्तेस ?
सारखं मागे वळुन मला का पहातेस?
ती - मला मोकाट सोडलेल्या कुत्र्यांची खूप भिती वाटते
म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते
तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान मी सहण करणार नाही ,
आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार नाही
ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून आनंद झाला,
पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा , आज वेळ कसा वाया गेला?
तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते असलेली लिस्ट काढून )
ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे
या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे
आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार
एक -दोघींचा तरी होकार मला नक्की मिळणार
ह्या दिवसाचा एक =एक क्शण माझ्यासाठी अनमोल आहे
तूझं माझ्यावर प्रेम आहे का? या सर्वांना विचारायचं आहे
ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल,
जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल
( दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू लागतात . इतक्यात तिला आवाज येतो व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच असतो. खुप
राग आला असताना ही ती नकळत तो जवळ येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच तो तिच्या हातावर नावांची यादि असलेला कागद ठेवतो.
ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ...
ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त माझेच नाव आहे .
मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे?
तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत आहेस
मी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं आहे .
(चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू लागतो .. थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो .. व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने वळुन पाहतो. ती पुन्हा मोठ्याने ओरडत त्याला विचारते ... व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन
--
आधी विचार करा, मग कृती करा.
For More Marathi Kavita, Marathi Jokes, Marathi Charolya, Lekh scraps, Stories, Greetings, Sahitya etc
Please Visit: http://mannmajhe.blogspot.com/
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
With Lots Of Love
Sachin Haldankar.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook