1
व्याकरणाच्या तासाला शिक्षिकेनं मोरूला विचारलं, ” काय रे, `मी सुंदर आहे’ या वाक्याचा `काळ’ कोणता?”
तिच्या चेहेऱ्याकडे पाहून मोरूनं उत्तर दिलं, “भुतकाळ.”

2
जगातलं मृत्यूचं प्रमाण वर्गाला समजावून देताना गुरुजी म्हणाले, “माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक या एकूण जगात एक माणूस मरत असतो.”
गुरुजींचं हे विधान ऐकून चिंतूनं त्यांना विचारलं, “असं जर आहे, तर गुरुजी तुम्ही श्‍वास घेताचं कशाला?”

3
छोट्या राघूनं विचारलं, “आई, माझी किंमत किती आहे गं?
आई- बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे.
राघू - मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?

Post a Comment Blogger

 
Top