खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?

पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले

फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का...

माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार

फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का.?

Post a Comment Blogger

 
Top